Nigdi : निगडीत लाकडाच्या वखारीला आग

एमपीसी न्यूज – निगडीमधील अमरधाम स्मशानभूमी जवळ असलेल्या  लाकडाच्या वखारीला आग लागली. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी पावणे पाच वाजता घडली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी मधील अमरधाम स्मशानभूमीजवळ लाकडाची वखार आहे. त्या वखारीला शुक्रवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आग (Nigdi) लागली. याबाबत माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, चिखली उपकेंद्र, प्राधिकरण उपकेंद्र, थेरगाव उपकेंद्र येथील बंब रवाना करण्यात आले.

Pune : पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स मॉलला भीषण आग, 5 बंब घटनास्थळी दाखल

जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अंत्यविधीसाठी लागणारा लाकूड फाटा असलेल्या वखारीला आग लागली होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.