Chinchwad : महाराष्ट्र ब्राह्मण सभेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र ब्राह्मण सभेची वार्षिक सर्वसाधारण (Chinchwad) शनिवारी (दि. 6) संपन्न झाली. सभेत विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. कार्यक्रमात संस्थेच्या नवीन वेबसाईटचे लोकार्पण झाले.

 

महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल व्यास यांच्या हस्ते स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यास यांनी उपस्थितांना संस्थेबद्दल माहिती दिली. 98 वर्षांपासून संस्था काम करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून प्रेरणा घेत श्री दाते, श्री आपटे, श्री करंदीकर यांनी या संस्थेची स्थापना केली.

Express Way Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; एक जण जागीच ठार

 

ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेची स्थापना झाली. देव, देश आणि धर्म तसेच राष्ट्र प्रथम या उद्दिष्टाने ही संस्था कार्य करत असल्याचे व्यास यांनी सांगितले.

 

प्रदेश, जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर काही नेमणूका झाल्या. मिलिंद बर्वे यांच्याकडे राष्ट्रीय व्यवसायिक विभाग अध्यक्षपद देण्यात आले. महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ. सचिन बोधले यांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडी अध्यक्षपदी मंजिरी सहस्त्रबुद्धे, सचिव शर्मिला महाजन तर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सुभाष फाटक, अमित गोडसे, अमित खेडकर, ॲड. संग्राम कोल्हटकर, हेरंब कोरडे, दिपाली जोशी, स्मिता येवलेकर, अश्विनी मेहरूनकर, वर्षा शिखरे, दीप्ती कुलकर्णी, अनंत उर्फ अवि जोशी पालमकर, मोरेश्वर कुलकर्णी यांची निवड झाली. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी शर्वरी येरगट्टीकर तर वाङ्मय गोडबोले यांच्याकडे पुणे शहराची जबाबदारी देण्यात (Chinchwad) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.