Express Way Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारचा भीषण अपघात ( Express Way Accident) झाला. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 21) सकाळी सहा वाजता घडला.

सुनील थोरात, मयुरी थोरात अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अक्षय सुनील थोरात (वय 27), दत्तात्रय थोरात (वय 60), तेजल थोरात (वय 25), शारदा थोरात (वय 48), राजवीर थोरात (वय 3) अशी जखमींची नावे आहेत.

Pimpri : पिंपरी येथे कचऱ्याला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, थोरात कुटुंब कारने (एमएच 14/एलबी 4630) मुंबईहून पुण्याला येत होते. बुधवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार 79 किलोमीटर येथे संरक्षक कठड्याला धडकली. जोरात बसलेल्या धडकेमुळे कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. तर कार मधील दोघांचा मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Express Way Accident) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.