Talegaon : यशवंत नगर येथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घराला आग

एमपीसी न्यूज – इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

यशवंत नगर मधील साई ज्योत सोसायटी मध्ये दुसऱ्या मजल्यावर एका सदनिकेत बुधवारी सकाळी आग लागली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव नगरपरिषद अग्निशमन विभाग आणि तळेगाव एमआयडीसी अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

Express Way Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र सदनिकेतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान ( Talegaon) झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.