Pimpri : अजित पवार यांच्यावर एक टक्काही अन्याय नाही – रोहित पवार

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार (Pimpri )यांच्यासाठी शरद पवार यांनी काय-काय केले आहे हे आम्ही लहापणापासून पाहत आहोत. पक्षाचे प्रमुख नेते होते. त्यांची व्यक्तिगत प्रगती देखील झाली आहे.

त्यांच्यावर एक टक्का सुद्धा अन्याय झाला नाही. अन्याय झाला (Pimpri )नसतानाही या वयात शरद पवार यांना सत्तेत जाण्यासाठी सोडले. हे कुटुंबियांना आवडले नाही, असल्याचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. तसेच अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र हा शरद पवार यांना साथ देतो, हे स्वागत करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.

रोहित पवार यांनी पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश प्रवक्ते  रविकांत वरपे, माजी  नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते.

कामठे यांनी अजित पवार हे सकाळी ठेकेदारांसोबत फिरतात,    त्यांची कामे करतात असा आरोप केला होता. त्यावर अजित पवार यांनी कामठे यांचा बाप काढला होता. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले,  शरद पवार यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षाच्या आरोपावर सत्तेतील उपमुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागते यातच आमची ताकद कळत आहे. शहरात शरद पवार, राष्ट्रवादीवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहे. अजित पवार यांच्या अवतीभवती ठेकेदार, मलिदा गँग  होती.

Pimpri : पिंपरी येथे कचऱ्याला भीषण आग

अजित पवार यांना सामान्य लोकांपर्यंत पोहचू दिले जात नव्हते. ठराविक लोकांकडेच ते जात होते. मलिदा  गँग तिकडे गेल्यानंतर प्रामाणिक कार्यकर्ते  आमच्याकडे राहिले आहेत.

अनिल तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा वाद आजचा नाही. सुनील तटकरे यांनी घरातच पदे ठेवली होती. अनिल तटकरे हे आमच्या संपर्कात होते. आजही आहेत. पण त्यांना अजून कोणतेही पद दिले नाही. शरद पवार, जयंत पाटील काय आहे ते ठरवतील, असेही ते म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.