Lonavala : कात्रज मधून अपहरण झालेल्या मुलाची लोणावळ्यातून सुटका

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या कात्रज भागातून अपहरण झालेल्या(Lonavala) 12 वर्षीय मुलाची पुणे पोलिसांनी लोणावळा येथून सुटका केली. पोलिसांनी अपहार करणाऱ्या तरुणाला देखील बेड्या ठोकल्या आहेत.

राजेश शेलार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला(Lonavala) पोलिसांनी कास पठार येथून ताब्यात घेतले आहे.

Express Way Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

राजेश याने तो जिथे भाड्याने राहत होता, त्या घर मालकाच्या 12 वर्षीय मुलाचे सोमवारी अपहरण केले. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. त्यावेळी घरच्यांना मुलाच्या मोबाईलवरून फोन आला. फोनवरून अपहरण करणारा व्यक्ती बोलत होता. अपहरण करणाऱ्या व्यक्तीने 30 हजार रुपये आपल्या खात्यात लगेच जमा करण्यास सांगितले.

यानंतर मुलाच्या पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत आपली तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पुणे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अपहृत मुलगा लोणावळा येथे असल्याची माहिती मिळवली.

आपल्या मागावर पोलीस असल्याचे लक्षात येताच आरोपीने मुलाला लोणावळा येथे सोडून पळ काढला. पोलिसांनी मुलाची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत कास पठार येथून ताब्यात घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.