Chinchwad : शिवजयंतीच्या निमित्ताने राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज जयंती, (Chinchwad) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवळकर गुरुजी यांच्या जयंती तसेच राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न झाले.

मोफत आयुर्वेद आरोग्य शिबिर भारतीय संस्कृती संवर्धन संस्था येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शिबिराचे उद्दघाटन प्रा.डॉ. प्रशांत साठे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे विशेष निमंत्रित सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय संस्कृत संवर्धन संस्थेचे प्रचारक प्रतिक भागवत, प्रा.डॉ.प्रशांत साठे, वैद्य. पाटणकर, वैद्य. वैंशपायन, वैद्य केतन देशमुख आदी उपस्थित होते.

Lonavala : कात्रज मधून अपहरण झालेल्या मुलाची लोणावळ्यातून सुटका

राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या या आरोग्य शिबिरासाठी वैद्य धनंजय इंचेकर, वैद्य. राधिका मराठे, वैद्य.वैष्णवी कुलकर्णी, वैद्य.शुभम् गाडेकर, वैद्य. हितेंद्र गवांडे, वैद्य.अनिकेत खैरे यांनी दिलेल्या योगदानामुळेही आरोग्य तपासणीची मोहीम (Chinchwad) उत्तमरित्या साकारली गेली.

या शिबीरासाठी धारप, मुकुंद तापकीर, सुधीर करंदीकर, प्रतिभा करंदीकर,प्रशांत तपस्वी, मोहन बागमार, सुनील देवधर, अनिता तलाठी, जयंत भावे, जगन्नाथ कुलकर्णी, गिरीष खत्री, अमोल डांगे, अमित झागडे यांच्यासह अनेकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्र निरगुडे, विशाल कुलकर्णी, श्रीकांत मंडले, योगिनी डफळ, सुनील देवभानकर, अमरजा पटवर्धन, शैलेश पाटील, प्राजक्ता कुलकर्णी, श्रद्धा मराठे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.