Akurdi : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा (Akurdi)मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.20) आकुर्डीतील खंडोबामाळ येथे घडला आहे.

साबीर अन्सारी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी (Akurdi)शहजाद उस्मान अन्सारी (वय 26 रा. थेरगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बस चालक विष्णूपंत सुदर्शन मित्रगोत्री (वय 43 रा.अक्कलकोट) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Lonavala : कात्रज मधून अपहरण झालेल्या मुलाची लोणावळ्यातून सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, निसार अन्सारी व साबीर अन्सारी हे दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने चालवून साबीर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात साबीरचा मृत्यू झाला तर निसार अन्सारी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.