Pimpri : पिंपरी येथे कचऱ्याला भीषण आग

एमपीसी न्यूज – मोरवाडी न्यायालयाच्या मागील बाजूला रिकाम्या ( Pimpri)  जागेत असलेल्या कचऱ्याला भीषण आग लागली. प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात उडाले. हा धूर संपूर्ण शहरातून दिसत होता. बुधवारी (दि. 21) दुपारी ही घटना घडली.

मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला रिकामे मैदान आहे. त्या मैदानात कचरा टाकलेला होता. बुधवारी दुपारी अचानक या कचऱ्याला आग लागली. आग मोठ्या प्रमाणात धुमसत होती.

Insurance : जीवन विमा भाग एक – कंपनी निवडताना क्लेम सेटलमेंट रेशो जाणून घ्या

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शहरातील सर्व अग्निशमन पथके घटनास्थळी दाखल झाली. या धुरामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. जवळच असलेल्या एम्पायर स्वेअर इमारतीमध्ये हा धूर पसरला. तसेच ऑटो क्लस्टर आणि मोरवाडी मध्ये धुराचे लोट पसरले ( Pimpri) होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.