AkshayTritiya : अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

एमपीसी न्यूज – अक्षय तृतीया, (Akshay Tritiya) 

दि. 10 मे 2024,

नक्षत्र – रोहिणी,स्वामी- चंद्र,

वार – शुक्रवार.

अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे 
* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. ते ही जमत नसेल तर आपल्या (AkshayTritiya) आंघोळीच्या बादलीत गंगाजल टाकून स्नान करणे.
* सकाळी पूर्ण शिधा आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
*  शक्य असेल तर ब्राह्मण भोजन घालावे.
* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.
* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.
शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीया
* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
अक्षय तृतीयेचे माहात्म्य
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.

* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया (Akshay Tritiya) असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय.
अक्षय फळ देणारी अक्षय तृतीया
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तर्पण करतात.शुक्रवार व मृगशीर्ष  नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेस पडते ती सर्वात उत्तम तिथी असते. या दिवशी आपणांस अत्यंत प्रिय असेल ते दान करावे. गौरी उत्सवाची या दिवशी सांगता होते. म्हणून स्‍त्रिया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या शिवाय बत्तासे, मोगर्‍याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेली हरबर्‍यांनी ओटी भरतात.
अक्षय तृतीयेचे व्रत कसे करावे ?
* व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठावे
* घराची स्वच्छता व नित्य कर्म करून शुद्ध पाण्याने आंघोळ करावी.
* घरातच एखाद्या पवित्र जागेवर विष्णूची प्रतिमा किंवा चित्र स्थापित करावे.
खाली दिलेल्या मंत्राने संकल्प करावा –
ममाखिलपापक्षयपूर्वक सकल शुभ फल प्राप्तये
भगवत्प्रीतिकामनया देवत्रयपूजनमहं करिष्ये।
संकल्प करून भगवान विष्णूला पंचामृताने अंघोळ घालावी. षोडशोपचार विधीद्वारे विष्णूची (AkshayTritiya) पूजा करावी. भगवान विष्णूला सुगंधित फुलांची माळ घालावी. नवैद्यात जवस किंवा गव्हाचे सातू, काकडी आणि हरबर्‍याची डाळ द्यावी.
जमत असेल तर विष्णू सहस्रनामाचा जप करावा.
शेवटी तुळशीला पाणी देऊन भक्तिभावाने आरती करावी.
अक्षय्य तृतीया, वार – शुक्रवार, रोहिणी चंद्राचे  नक्षत्र  या दिवशी आपणास कोणता मंत्र वा स्तोत्र सिद्ध करायचे असेल तर अतिशय उत्तम दिवस. कोणतीही उपासना प्रारंभ करण्यासाठी अक्षय्य तृतीया सारखा उत्तम दिवस आपणास मिळणार नाही. या दिवशी पूर्वजांच्या स्मरणार्थ शंकराला किंवा दत्तगुरुना गुरुजींकडून अभिषेक करावा. आजचा दिवस उदक शांतीसाठी उत्तम (Akshay Tritiya) दिवस.
 शुभ भंवतु
– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.