Sharad Pawar : शरद पवार गटाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर होणार?

एमपीसी न्यूज -कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची (Sharad Pawar)पहिली यादी जाहीर केली आहे.शरद पवार यांनी अद्यापही आपली यादी जाहीर केलेली नाही.

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाला 19, काँग्रेस 16 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला(Sharad Pawar) 9 जागा असे जागावाटप झाले असून चार जागांवर अजून निर्णय होणे बाकी आहे.

उद्धव ठाकरे गटाने 17 जागांची यादी जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसने 10 जागांची उमेदवारी यादी जाहीर केली. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकताही आता संपणार आहे. शरद पवार गटाची पहिली यादी आज शनिवारी जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

जागावाटपामध्ये बारामती, शिरूर, सातारा, अहमदनगर, रावेर, दिंडोरी, बीड, वर्धा आणि माढा हे मतदारसंघ शरद पवार यांच्या गटाला मिळाले आहे.

यातील बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.अन्य उमेदवार कोण असणार याची यादी आज शनिवारी जाहीर केली जाणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या पक्षात परतले आहेत.

आमदार निलेश लंके यांना अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात येऊ शकते. अहमदनगरमध्ये विखे पाटील आणि लंके यांच्यात प्रमुख लढत असणार आहे.

Pune: दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘निवारा’ वृद्धाश्रमात शिधावाटप

ठाकरे गटाला १६ मतदार संघ मिळाले आहेत. यात जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, रायगड, मावळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणगले, हिंगोली, शिर्डी, औरंगाबाद, यवतमाळ-वाशीम आणि धाराशिव या मतदार संघाचा समावेश आहे.

काँग्रेसकडे असलेले मतदारसंघ नंदुरबार, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, मुंबई उत्तर मध्य, सोलापूर, नागपूर, पुणे, लातूर, जालना, अकोला, अमरावती, भंडारा-गोंदिया, कोल्हापूर आणि रामटेक आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे 9 मतदार संघ असून यात बारामती, शिरूर, सातारा, अहमदनगर, रावेर, दिंडोरी, बीड, वर्धा आणि माढा यांचा समावेश आहे.

चार जागांवर निर्णय होणे बाकी आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.