Pune: दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘निवारा’ वृद्धाश्रमात शिधावाटप

एमपीसी न्यूज – सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर राहिलेले आणि पुणे शहराच्या विकासाला गती देणारे लोकनेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आज कसबा विधानसभा (Pune) मतदारसंघ भाजपाकडून निवारा वृद्धाश्रमात शिधावाटप करण्यात आले.

कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. लोकनेते गिरीश भाऊ बापट यांनी समाजातील प्रत्येक घटकाला मदतीची भूमिका आपल्या आयुष्यामध्ये कायम निभावली, त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त निवारा वृध्दाश्रमात शिधा वाटप करत खऱ्या अर्थाने एक आगळवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की “गेली तीन दशके लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना भाजपा परिवाराचे प्रमुख म्हणून स्वर्गीय गिरीश भाऊंनी भूमिका पार पाडली. सामान्यांना मदत करण्याचे संस्कार त्यांनी आम्हाला दिले असून त्यांची शिकवण आणि दाखवलेल्या वाटेवरून लोककल्याणाचे काम संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून केले जाते. पुण्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे शहराला प्रगतीपथावर घेऊन जाणारे आहे. गरजूवंताला मदतीचा हात पुढे करण्याचे त्यांनी केलेले संस्कार खऱ्या अर्थाने राबवण्यासाठी आज निवारा वृद्धाश्रमात छोटीशी भेट म्हणून शिधा वाटप करण्यात आले”.

निवारा ही सेवाभावी संस्था (Pune)155 वर्षांपासून वृद्धांचे व अपंगाचे आश्रयस्थान म्हणून पुण्यात प्रसिद्ध आहे. वृद्ध निराधारांची सेवा करणे हे या ट्रस्टचे मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट आहे. एकदा निवारा येथे दाखल झाल्यानंतर, येथील रहिवाशांसाठी सर्व सेवा विनामूल्य देण्यात येतात. समाजातील सर्व स्तरातील दानशूर लोक देणगी देण्यासाठी पुढे येतात. या दानशूर व्यक्तींमुळे निवारा ट्रस्टला वृद्ध निराधारांची सेवा करण्यास मिळते असे ट्रस्टने सांगितले. निवारा वृद्धाश्रमाला 155 वर्षं पूर्ण झाली असून समाजातील वृद्ध निराधार लोकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहिलेला आहे.

Mahalunge : मोबाईल फोडला म्हणून मित्राचा खून

यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघ  (Pune)अध्यक्ष राजेंद्र काकडे, मतदारसंघाचे पालक संजय मामा देशमुख, नगरसेवक अजय खेडेकर, गायत्री खडके, सरचिटणीस प्रणव गंजीवाले, राणीताई कांबळे, वैशाली नाईक, उमेश अण्णा चव्हाण, अमित कंक, चंद्रकांत पोटे, प्रशांत सुर्वे, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश कदम, महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पवार, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर, अनिल बेलकर, तुषार रायकर यांच्यासह मतदार संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.