Today’s Horoscope 30 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 30 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग-
आजचा दिवस – शनिवार.

तारीख – 30.03.2024.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – रंगपंचमी.

राहू काळ – सकाळी9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – अनुराधा 22.04 पर्यंत नंतर ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक.
—————————–
मेष- ( शुभ रंग- क्रीम)
विश्वासू माणसा कडून ही विश्वासघात होईल. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृषभ (शुभ रंग- भगवा)
आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. आज प्रेम प्रकरणात फसवणूक संभवते.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)
काम कमी आणि दगदग जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादाला कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल.

सिंह ( शुभ रंग- मरून)
धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगली जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल.

कन्या (शुभ रंग- हिरवा)
आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)
आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमची तब्येत थोडी नरमस असेल. एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींना जरा लांबच ठेवा.

धनु (शुभरंग- भगवा)
पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

मकर (शुभ रंग- निळा )
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

कुंभ ( शुभरंग- सोनेरी)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून आज सर्व कामे सुरळीत पार पडतील. आज तुम्ही फक्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल.

मीन (शुभ रंग- निळा)
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.