Sablewadi: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा (Sablewadi)मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 16) रात्री दहा वाजता चाकण-शिक्रापूर मार्गावर साबळेवाडी येथे घडला.
शुभम महादेव सायकर (वय 20, रा. कर्जत, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या(Sablewadi) दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी शुभम याचा भाऊ सागर महादेव सायकर (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kasarasai: सोशल मिडीयावरील मेसेजला रिप्लाय अन तरुणीच्या नातेवाईकांकडून तरुणाला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ शुभम हे त्यांच्या दुचाकीवरून (Sablewadi)चाकण-शिक्रापूर रोडने जात होते. साबळेवाडी येथे प्राथमिक शाळेजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली.
त्यामध्ये शुभम हे रस्त्याव पडले. त्यानंतर वाहन चालकाने शुभम यांच्या डोक्यावर वाहन चालवून त्यांना गंभीर जखमी केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.