Pune: माहिती लपवणे व खोटी माहिती पुरवल्याबद्दल ससूनच्या अधिकाऱ्याविरोधात राज्य माहिती आयोगाची शिस्तभंगाची कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना काळात शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये (Pune)वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता याबद्दल माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागवली असता,  याचे सिसी टीव्ही फुटेज काढून टाकून त्याबाबत खोटी माहिती पुरवल्याबद्द्ल ससूनच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई राज्य माहिती आयोगाने केली आहे.  

माहिती अधिकार महासंघ  महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन (Pune)समिती सचिव प्रदीप नाईक सचिव यांनी देखील राज्य माहिती आयुक्तांकडे कारवाई ची मागणी केली आहे.
राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे याबाबत शाहिद रजा बर्नी यांनी तक्रार दिली होतीय.त्यानुसार गणेश बडदरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी, ससून सर्वोपचार रुग्णालय व उप अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.शाहिद बर्नी यांनी केलेल्या अर्जात म्हटले आहे की, आयोगाने 27 जुलै 2022 रोजी जे आदेश दिले होते त्याचे संदर्भात जन माहिती अधिकारी  गणेश बडदरे यांनी शपथ पत्रावर खोटी माहिती आयोगाकडे दिली.

तक्रारदार यांनी तक्रार अर्जामध्ये नमूद केले की, त्यांनी दि.26 मे 2020रोजी माहिती अर्ज दिला होता, त्यामध्ये 20 मे 2020 रोजी चे सीसीटीव्ही फुटेज ची माहिती मागितली होती.  मागणीप्रमाणे संबंधित सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याबाबत सूचना दिली होती. तरी पण सीसीटीव्ही फुटेज दिले नाही.

Khadaki : खडकी येथे भंगारच्या गोदामाला आग

त्यामध्ये 22 फेब्रुवारी 2024  रोजी सुनावणी आयोजित केली असता तक्रारदार  शहीद रजा बर्नी ऑनलाईन हजर होते.  सुनावणी चे दिवशी तक्रारदार. शाहिद बर्नी यांनी सूचित केले की, माहिती अर्जा नुसार जे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. ते सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे होते. कोरोना कालावधीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. म्हणून जाणुनबुजून सीसीटीव्ही फुटेज काढून टाकले.
सुनावणी दरम्यान युक्तिवाद व आयोगास सादर करण्यात आलेली कागदपत्रे विचारात घेता असे दिसून येते की,  गणेश बडदरे, जन माहिती अधिकारी यांनी 20 मे 2020  रोजी चे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित करुन ठेवणे आवश्यक होते. त्या ब‌द्दल त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.
सहयोग प्राध्यापक, शरीररचना शास्त्र विभाग (सी.सी.टी.व्ही. विभाग) ससून रुग्णालय, पुणे यांनी 2 वर्षानंतर बडदरे यांना लेखी सूचित केले की, सी.सी.टी.व्ही.फुटेज 10 दिवसच जतन करुन ठेवण्यात येते. अशा परिस्थितीत  बडदरे यांनी 20 जून 2020  रोजी उत्तर करतांना, माहिती आढळून येत नाही असे कोणत्या आधारे नमूद केले होते.

याशिवाय बडदरे यांनी 26 मे 2020 रोजी अधिष्ठाता, बी. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांना माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 कलम 5(5) खाली माहिती देणेबाबत सूचित केले होते पण त्याबद्दल कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशा परिस्थितीत  बडदरे यांनी उत्तर दिले. मात्र  हे  उत्तर कोणत्या आधारे दिले ते स्पष्ट होत नाही. तसेच . गणेश बडदरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ नये अशा प्रकारची कार्यवाही करुन अडथळा आणला. तसेच जतन कालावधी बाबत योग्य खात्री न करता सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवले नाही.

या साऱ्या पडताळणी नंतर  ससून रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गणेश बडदरे यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच 25 हजार रुपये दंड व एक महिन्याच्या आत कारवाई का करु नये याचे उत्तर आयोगाला सादर करावे असे आदेश राज्य माहिती आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=k45pNhWBs4s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.