MPSC PSI Physical Test : पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही शारिरिक चाचणी 24 मे ते 6 जून 2024 या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार(MPSC PSI Physical Test) आहे.

या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम 15 एप्रिल ते 2 मे, 2024 या कालावधीत नियोजित होता. लोकसभा निवडणुकांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता मैदान, अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने सहमती दिली आहे. त्यामुळे शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम 24 मे ते 6 जून, 2024 या कालावधीत घेण्यात(MPSC PSI Physical Test) येणार आहे.

शारीरिक चाचणीचा कार्यक्रम तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेतला जाणार आहे. शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने याची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करावा, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आले आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

K. D. Sonigara Jewelers : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी के. डी. सोनिगरा ज्वेलर्स यांची खास ऑफर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.