Pune: ॲनिमॅट्रोनिक हत्तीण लहानग्यांना देणार प्राणी संवर्धनाचे धडे;पेटा इंडिया आणि फ्रिडा आर्ट हाऊस यांचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज – ॲनिमॅट्रोनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बनविण्यात आलेली एली ही(Pune) हत्तीण आता शहरातील लहानग्यांना प्राणी संवर्धनाचे धडे देणार आहे. ॲनिमॅट्रोनिक तंत्रज्ञानाद्वारे या हत्तीणीची निर्मिती करण्यात आली असून आशियातील हा पहिलाच प्रयत्न आहे.

 

प्राणी संवर्धनासंदर्भांत नव्या पिढीमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (Pune)अर्थात पेटा इंडिया आणि फ्रिडा आर्ट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभिनव शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आला असून उद्या मंगळवार दि. 19 मार्च ते रविवार दि 24 मार्च दरम्यान या ॲनिमॅट्रोनिक हत्तीणीचे मॉडेल अनुभविण्याची संधी मुलांना मिळणार आहे. इतकेच नव्हे तर एलीची गोष्ट, तिला आलेली आव्हाने, संकटे याविषयी एली मुलांशी संवाद साधेल.

येरवडा येथील हॉटेल रिट्ज कार्लटन येथे असलेल्या फ्रिडा आर्ट हाऊस या ठिकाणी एली हत्तीणीला सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 आणि दुपारी 2.30 ते सायं 5.30 दरम्यान भेटता येईल. मुलांसाठी ही भेट विनामूल्य असून गर्दी टाळण्यासाठी आगावू नोंदणी केल्यास उत्तम असे आयोजकांच्या वतीने सुचविण्यात आले आहे. आगाऊ नोंदणीसाठी ९७६७४४२२२२ या क्रमांकावर संपर्क करण्यात येईल.

विद्यार्थ्यांमध्ये प्राणी कल्याण आणि संवर्धनाविषयी जागरुकता यावी यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला असून तरुण पिढीमध्ये प्राण्यांबद्दल करुणा निर्माण व्हावी हा या मागील उद्देश असल्याचे फ्रिडा आर्ट हाऊसच्या संस्थापिका श्रद्धा गीते म्हणाल्या.

Pimpri : सामाजिक बांधिलकी समजून पक्षाची काळजी घ्या – अण्णा जोगदंड

ॲनिमॅट्रोनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बनविण्यात आलेली एली ही 6.5फूट उंच 12 वर्षांची वास्तववादी हत्तीण यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधेल. या संवादात्मक उपक्रमात एली उपस्थित विद्यार्थ्यांशी तिच्यासमोरील आव्हाने, संकटे आणि तिचे अनुभव कथन करेल. प्राण्यांची सुरक्षितता, त्यांचे हक्क आणि संवर्धन या महत्त्वाच्या विषयावर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजासह, एली हत्तीणीचा प्रवास या उपक्रमात सर्वांसमोर येणार असल्याचेही गीते यांनी सांगितले.

प्रसून बसू यांनी पारंपारिक कारागिरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ घडवून आणत  साकारलेली एली हत्तीण ही डोळ्यांचे पारणे फेडते. प्लास्टर आणि चिकणमातीसारख्या सामग्रीपासून ते पॉलियुरेथेन आणि सिलिकॉनसारख्या प्रगत पदार्थांचा वापर एलीचे हे मॉडेल बनविताना केला आहे. हे बनवीत असताना लेझर कटिंग आणि थ्री डी प्रिंटिंगसारखे तंत्रज्ञान देखील वापरण्यात आले आहे हे विशेष.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.