Kasarasai: सोशल मिडीयावरील मेसेजला रिप्लाय अन तरुणीच्या नातेवाईकांकडून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – तरुणीने केलेल्या मेसेजला तरुणाने रिप्लाय(Kasarasai) केला. त्यावरून झालेल्या वादातून तरुणीच्या भावाने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी पावणे दोन वाजता कासारसाई येथे घडली.
सदाशिव भीमाशंकर शिंदे (वय 26, रा. कासारसाई, ता. मावळ) यांनी (Kasarasai)याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय सदाशिव सुरोसे (वय 22, रा. कासारसाई, ता. मावळ) आणि इतर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदाशिव यांना आरोपी अक्षय याच्या बहिणीने सोशल मिडियावर हाय असा मेसेज केला. त्याला रिप्लाय म्हणून सदाशिव यांनी देखील हाय असा मेसेज केला. त्यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला.

 

तो वाद सामोपचाराने मिटवण्यात आला. मात्र त्यावेळी अक्षय याच्या वडिलांनी सदाशिव यांना मारहाण असल्याची धमकी दिली. रविवारी दुपारी सदाशिव हे मित्रांसोबत गप्पा मारत थांबले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी सदाशिव यांना बोलण्याच्या बहाण्याने बाजूला घेऊन बेदम मारहाण केली. सदाशिव यांच्या काकांना देखील आरोपींनी मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.