Pimpri : सामाजिक बांधिलकी समजून पक्षाची काळजी घ्या – अण्णा जोगदंड

एमपीसी न्यूज – शहरात चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे.जागतिक बँकेच्या (Pimpri )अहवालानुसार 62 % पेक्षा जास्त खेड्याचे रूपांतर शहरात झाले आहे. शेत जमीन नामशेष होऊन सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे जंगल निर्माण होऊ लागले आहेत.

 

पक्षांचा शहरातील अधिवास कमी होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक (Pimpri )बांधिलकीतून पक्षाची काळजी घेण्याचे आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी जागतिक चिमणी दिना निमित्ताने केले आहे.

प्रदूषणामुळे चिमण्या बरोबरच इतरही पक्षाचा ही आदिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लहानपणी अंगणातील चिमण्यांची घरटे किलबिलाट ऐकायला मिळात होता.  ग. दि. माडगूळकर यांच्या ” या चिमण्यांनो परत या ”  याप्रेरणेने दरवर्षी मी फेब्रुवारीपासूनच चार महिने चिऊताई साठी प्लास्टिकच्या भांड्यामध्ये घरासमोर, गँलरीत पाण्याने भरलेले टोपले व टेरेसवर धान्याची गेल्या 5 वर्षांपासून  सोय करत आहे असे सांगून अण्णा जोगदंड म्हणाले की मोबाईलचे टावर ,विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होत आहे.

Pimpri: जावयाच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

तसेच वायू प्रदूषण,पिकासाठी शेतीमध्ये वापरले जाणारे रसायनिक औषधे ,खते,रसायुक्त पाणी नदी पात्रात येते. यामुळे चिमण्यांचा अधिवास कमी होत चाललेला आहे .प्रत्यकने आपापल्या परीने चार महिने तरी पाण्याची सोय करावी. काही चिमण्या पहाटेपासून गॅलरी येतात त्यांचा आवाज ऐकून खूप आनंद वाटतो. एक प्रकारच्या घड्याळाप्रमाणे सकाळी सकाळी आवाज देतात. यामुळे आम्हाला त्याची सवय झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.