Pimpri: जावयाच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज –  जावयाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीचा छळ केला. तसेच हुंड्यापोटी (Pimpri)पैशांची वारंवार मागणी केली. या त्रासाला कंटाळून सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तळेगाव, पिंपरी आणि चिंचवड येथे घडला.

बाळासाहेब रामभाऊ केदार (वय 57) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब (Pimpri)यांच्या 29 वर्षीय मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावई विक्रांत विजय शेवाळे (वय 29), विजय गणपत शेवाळे (वय 58), एक महिला (वय 48, सर्व रा. तळेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. विक्रांत याला घर घेण्यासाठी त्याने फिर्यादी यांच्या वडिलांकडे 50 लाख रुपये हुंड्याची मागणी केली.

 

जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत मुलीला सासरी घेऊन जाणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांचे वडील तणावात होते.

त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींनी फिर्यादी विवाहितेचा छळ करून त्यांच्या वडिलांना हुंडा मागून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.