Nigdi : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – निगडी येथील फोनिक्स स्पा सेंटर मध्ये स्पाच्या नावाखाली(Nigdi) वेश्या व्यवसाय सुरु होता. यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 16) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

दिनेश कुमार गुप्ता (वय 30, रा. मुंबई) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा (Nigdi)दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगी येथील इंस्पिरीया मॉल मध्ये चौथ्या मजल्यावर फोनिक्स स्पा नावाचे मसाज सेंटर आहे. तिथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा लावत स्पा सेंटरवर छापा मारला.

PCMC : पाण्याचा गैरवापर टाळा, महापालिकेचे आवाहन

आरोपींनी चार महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पोलिसांनी चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार मारुती करचुंडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.