Indori: मद्यपी दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज –  एका दुचाकीस्वाराने मद्य प्राशन करून दुचाकी (Indori)चालवली. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 16) रात्री बारा वाजता इंदोरी येथे घडला.

दत्तात्रय गणेश चुकाटे (वय 46, रा. डाळ आळी, तळेगाव दाभाडे) असे मृत्यू (Indori)झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत रेळेकर यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पदावरून हटवण्याचा निवडणूक आयोगाने दिला आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय यांनी मद्य प्राशन करून दुचाकी चालवली. ते त्यांच्या दुचाकीवरून इंदुरी येथून जात असताना त्यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे अपघात होऊन ते पडले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.