Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पदावरून हटवण्याचा निवडणूक आयोगाने दिला आदेश

एमपीसी न्यूज – भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज   बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल  ( Mumbai )  यांना हटवण्याचे आदेश  दिले आहेत. आयुक्त इक्बाल सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत .

विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने फक्त मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश दिले नाहीत तर व गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाने  हे बदलीचे आदेश दिले आहेत.

Pimpri : धुलीवंदनला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना करा – अमित गावडे

तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी दिला होता. या आदेशामुळे मुंबई चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार होत्या. दरम्यान, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने त्यांना बदली आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारने यासंदर्भातील पत्र निवडणूक आयोगाला पाठविले होते.

मात्र,  आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळली व आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना  आज पदावरून हटवण्याचे आदेश  दिले आहेत. इक्बाल सिंग चहल हे महाराष्ट्र केडरचे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले ( Mumbai ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.