Sangvi: सांगवी मधून सात किलो गांजा, 175 ग्रॅम चरस जप्त, पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी(Sangvi) पथकाने सांगवी येथे मोठी कारवाई केली आहे. पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून सात किलो गांजा 175 ग्रॅम चरस, 12 एलएसडी डॉट पेपर आणि इतर साहित्य असा एकूण 20 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 17) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास सांगवी स्मशानभूमीजवळ करण्यात आली.

ओंकार उर्फ सोन्या महादेव लिंगे (वय 26), अनिकेत अनिल गोडांबे (वय 25), रोहन उत्तम कांबळे (वय 21), रुपेश गौतम जाधव (Sangvi)(वय 21), रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे (वय 24, सर्व रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह विशाल उर्फ महाद्या गोरख कदम, सेनानी, हर्ष, मयूर प्रवीण बाराथे (पूर्ण नावे माहिती नाहीत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : धुलीवंदनला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना करा – अमित गावडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी स्मशान भूमिजवळ काहीजण गांजा घेऊन आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन लाख 60 हजार रुपये किमतीचा 7 किलो 200 ग्रॅम गांजा, चार लाख 37 हजार 500 रुपये किमतीचे 175 ग्रॅम चरस, एक लाख 80 हजार रुपये किमतीचे 12 एलएसडी डॉट पेपर, सहा मोबाईल फोन, एक कार, तीन दुचाकी असा एकूण 20 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेल्या पाच आरोपींसोबत असलेला मयूर बाराथे हा पळून गेला आहे. अटक केलेल्या आरोपींना विशाल कदम याने गांजा आणून दिला होता. तर चरस हे त्यांनी मध्य प्रदेश येथून सेनानी नावाच्या व्यक्तीकडून आणले होते. एलएसडी पेपर हा अमली पदार्थ बाणेर येथे राहणाऱ्या हर्ष याच्याकडून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.