Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 22 जागा; संजोग वाघेरे यांना मावळ मधून उमेदवारी

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गणित निश्चित(Loksabha Election 2024) झाल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी मध्ये ठाकरे गटाला 22 जागा मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मतदार संघ आणि उमेदवारांची नावे उद्धव ठाकरे जाहीर करणार आहेत. दरम्यान मावळ मधून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव, कल्याण, पालघर, उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघात(Loksabha Election 2024) कोणता उमेदवार द्यायचा याबाबत निर्णय झाला नाही. तिथेही ठाकरे गटाकडून लवकरच उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळेल. हातकणंगले मतदारसंघात उमेदवार न देता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे पाटील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गेले. ठाकरे गटाकडून वाघिरे पाटील यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये संजोग वाघेरे पाटील सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
संभाव्य उमेदवारी निश्चित झालेले मतदार संघ  – बुलढाणा (नरेंद्र खेडेकर), यवतमाळ वाशीम (संजय देशमुख), हिंगोली (नागेश पाटील आष्टीकर), परभणी (संजय जाधव), छत्रपती संभाजीनगर (चंद्रकांत खैरे), धाराशिव (ओमराजे निंबाळकर), शिर्डी (भाऊसाहेब वाकचौरे), नाशिक (विजय करंजकर), ठाणे (राजन विचारे), मुंबई उत्तर पूर्व (संजय दिना पाटील), मुंबई दक्षिण (अरविंद सावंत), मुंबई दक्षिण मध्य (अनिल देसाई), मुंबई उत्तर पश्चिम (अमोल कीर्तिकर), रत्नागिरी सिंधुदुर्ग (विनायक राऊत), रायगड (आनंद गीते), सांगली (चंद्रहार पाटील), हातकणंगले (राजू शेट्टी – स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा), मावळ (संजोग वाघेरे)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.