Nigdi : शस्त्राच्या धाकाने नागरिकांना लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना अडवायचे. त्यांना शस्त्राचा धाक (Nigdi )दाखवायचा आणि त्यांच्याकडून मिळेल ती रक्कम लुटायची, असा डाव आखून दबा धरून बसलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळून लावला. ही कारवाई शनिवारी (दि. 16) रात्री साडेआठ वाजता ओटास्कीम येथील स्मशानभूमिजवळ करण्यात आली.

गणेश तुकाराम सांगोळकर (वय 23, रा. ओटास्कीम, निगडी), चंद्रकांत अंकुश चव्हाण (Nigdi )(वय 36, रा. तळवडे), विनोद शिवचरण हिप्परीकर (वय 35, रा. ओटास्कीम, निगडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह प्रकाश चंद्रकांत धोत्रे (रा. तळवडे), पंचू तावडे (रा. तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनायक मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Indapur: इंदापुरात झालेला तो खून दोन टोळ्यातील वर्चस्व वादातून; 4आरोपी अटकेत

सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम स्मशानभूमी येथे काहीजण दारू प्यायला बसत असून ते रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुषंगाने पोलिसांनी परिसरात पाहणी केली. त्यावेळी पाचजण स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूला दबा धरून बसले होते. ते रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत होते.

त्यामुळे पोलिसांनी सापळा लाऊन तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे दोन साथीदार अंधारात पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे एक एअरगन, एक बनावट पिस्टल, मिरचीपूड, रिक्षा असा एकूण 64 हजारांचा मुद्देमाल आढळून आला आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून मिळेल ती रक्कम लुटण्याचा आरोपींचा डाव होता. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.