Railway News : कामशेत मळवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक (Railway News)सोमवारी (दि. 18) सायंकाळी कोलमडले. पुणे लोणावळा लोहमार्गावर कामशेत ते मळवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे गाड्या उशिराने धावल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे लोणावळा लोहमार्गावर कामशेत ते मळवली(Railway News) दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना सोमवारी (दि. 18) दुपारी घडली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या कर्जत येथे थांबवण्यात आल्या. तर पुण्याहून लोणावळ्याकडे जाणारी वाहतूक तळेगाव पर्यंत सुरू होती.

पुणे लोणावळा दरम्यान लाखो प्रवासी दररोज लोकलने प्रवास करतात. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांमध्ये अडकून पडले. लोकल गाड्यांना तब्बल पाऊण तास उशिराने धावल्या.
प्रत्येक आठवड्यात रेल्वेकडून रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. या ब्लॉक साठी अनेक लोकल रद्द केल्या जातात. देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणासाठी हा ब्लॉक घेतला जातो. तरी देखील अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.