Pune: मोक्याच्या ठिकाणी असलेली सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे तीव्र आंदोलन

एमपीसी न्यूज –  मोक्याच्या ठिकाणी असलेली सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात ? घालण्या (Pune)विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. 
महाराष्ट्राला लाभलेले द्रष्टे नेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राच्या भविष्याचा (Pune)विचार करून सरकारी आस्थापनांची निर्मिती केली. या सरकारी आस्थापनांची मोक्याच्या अर्थात वाकडेवाडी या ठिकाणी असलेली जमीन कवडीमोल भावात विकण्याचं पाप हे तिघाडी सरकार ( शिंदे-पवार-फडनवीस ) करत आहे.
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, पुण्यासह महाराष्ट्रातील जनतेला सकस दुधाचा पुरवठा व्हावा यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आरे डेअरीची स्थापना केली.
पुढे राजकीय नेत्यांनीच स्वतःचे दूध संघ काढल्याने हा आरे दूध संघ डबघाईला आला. पुणे शहराच्या अगदी प्रवेशद्वारावर वाकडेवाडी येथे मोक्याच्या ठिकाणी असलेली आरे डेअरीची तब्बल 16 एकर जमीन विकण्याचा डाव आता या तिघाडी सरकारने मांडला आहे. ही जागा फडणवीस, शिंदे, पवार यांच्या मालकीची नसून पुणेकरांच्या मालकीची आहे, याचा विसर त्यांना पडला असा आरोप करत प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

 

Sablewadi: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने कोविडच्या काळात कोविड सेंटर उभारण्यासाठी सीओईपी संस्थेची जागा मागण्याची वेळ यापूर्वी पुणे महानगरपालिकेवर आली होती, हा  भूतकाळ ताजा असतानाच भविष्यात अशी आपत्तिच  येणार नाही, असं गृहीत धरून एवढा मोठा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचं कारण काय? 10 हजार कोटी रुपयांची जमीन 400 कोटीपेक्षा कमी किंमतीत विकण्यात कोणाचं हित आहे? असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला.
या जागेवर मोठे सरकारी हॉस्पिटल अथवा शाळा उभारून सामान्य पुणेकरांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार फक्त बिल्डरांचे घर भरण्यात व्यस्त आहे, हा सरकारने सामान्य पुणेकर जनतेवर घातलेला दरोडा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे  माझ्यासह उदय महाले, गणेश नलावड़े, राजू साने, रमीज सैयद, रोहन पायगुड़े, प्रसाद गावड़े, आशाताई साने, किशोर कांबले, स्वप्निल जोशी, दिलशाद आतार, हेमंत बधे, प्रसिद्धी प्रमुख अमोघ ढमाले, तथा शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.