Vijay Shivatare: वर्षा बंगल्यावर विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद मिटला; फडणवीसांच्या मध्यस्थीला यश

एमपीसी न्यूज – राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर(Vijay Shivatare) आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला असून दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याची माहिती आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत ही समेट घडवून आणल्याचं कळतंय. (Vijay Shivatare)त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतल्या नेत्यांमधील वाद आता जवळपास संपुष्टात आला आहे.

आज विजय शिवतारे पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे.

 

Lok Sabha Election: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून होणार सुरवात

 

त्यातच बारामती मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीही अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. अजित पवार उर्मट असल्याचं सांगत बारामतीत पवारांविरोधात उमेदवारी अर्ज भरणारच असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला . त्यामुळे बारामतीत लोकसभेची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती.

शिवतारे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कारवाई केली पाहिजे, असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं होतं. बुधवारी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवास्थानी चर्चा केली.

यावेळी अजित पवार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची देखील उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या समेट घडवून आणण्यास देवेंद्र फडणवीसांना यश आल्याचं कळतंय. आज विजय शिवतारे पत्रकारपरिषद घेऊ आपली भूमिका मांडणार असून ते बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय मागे घेऊ शकतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.