Lok Sabha Election: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून होणार सुरवात

एमपीसीन्यूज -लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणूकीच्या अधिसुचना आज जारी केल्या जाणार आहे. महाराष्ट्रातील 8 लोकसभा(Lok Sabha Election) मतदारसंघात ही अधिसुचना जारी केली जाणार आहे.

यात मराठवाड्यातील परभणी , नांदेड , हिंगोली या सह विदर्भातील (Lok Sabha Election)बुलढाणा , अमरावती, वाशीम , यवतमाळ , अकोला , वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. या 8 ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज विक्री करण्यास आज सुरवात करण्यात येईल . तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे.

Pune: शरद पवारांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला अजित पवारांकडून प्रत्युत्तर; काही लोकं गैरसमज पसरवत आहेत

लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्यातील  वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल-

नामांकन : 28 मार्च 2024

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2024

छाननी : 05 एप्रिल 2024 होईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024 असेल.

मतदान : 26 एप्रिल 2024 होईल.

परभणी,नांदेड,हिंगोली, बुलढाणा, अमरावती ,वाशीम ,यवतमाळ,अकोला या जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल.

उमेदवारांना ऑफलाईन, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त पक्षांना ए व बी फॉर्म दाखल करणे बंधनकारक असेल.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.