Today’s Horoscope 28 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 28 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 28.03.2024.

शुभाशुभ विचार- भद्रा वर्ज्य.

आज विशेष – संकष्ट चतुर्थी. ( चंद्र 21.44)

राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – स्वाती 18.38पर्यंत नंतर विशाखा.

चंद्र राशी – तुळ.
—————————–
मेष- ( शुभ रंग- राखाडी)
नोकरी धंद्यात उत्साही वातावरण राहील. आज महत्त्वाचे व्यावसायिक करार यशस्वी होतील. तुमच्यातील सकारात्मकतेने समोरच्या व्यक्तीला प्रभावित कराल.

वृषभ (शुभ रंग- लाल)
मामा मावशी कडून काही महत्त्वाच्या बातम्या येतील. आज काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

मिथुन (शुभ रंग – भगवा)
कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदराला पात्र होतील. आज तुम्ही गरजूंना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

सिंह ( शुभ रंग- सोनेरी)
आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. आज शेजाऱ्यांशी गोडी गुलाबी राहील. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. पण तसे करू नका.

कन्या (शुभ रंग- मोतिया)
धंद्यातील येणी वसूल होतील. तुमचा आज कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना योग्यतो वाव मिळेल. उत्तम दिवस आहे.

तूळ (शुभ रंग- पांढरा)
एखादी हरवलेली वस्तू गवसेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी होईल. घरात थोरा मोठ्यांच्या हो ला हो करा. वाद वाढवू नका.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गाला विदेश दौरे घडतील. हातसे सोडून मृगजळा मागे धावायचा मोह होईल.

धनु (शुभरंग- हिरवा)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आज तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.

मकर (शुभ रंग- गुलाबी )
व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. नोकरदारांना वरिष्ठांच्या दडपणात काम करावे लागेल. वैवाहिक जीवनात थोडे लाडिक रुसवे फुगवे असतील.

कुंभ ( शुभरंग- निळा)
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरदारांना अधिकाऱ्यांचे मूड सांभाळावे लागतील. घरात थोरांच्या होला हो करून वाद टाळावे लागतील. दैव साथ देईल.

मीन (शुभ रंग- आकाशी)
आज कार्यक्षेत्रात तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. उपासनेने मानसिक बळ वाढेल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.