Pune: शरद पवारांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला अजित पवारांकडून प्रत्युत्तर; काही लोकं गैरसमज पसरवत आहेत

एमपीसी न्यूज –  पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले,(Pune) नरेंद्र मोदी जर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले तर ते देशाचं संविधान बदलतील. त्याचसाठी भाजप आणि विशेषत: नरेंद्र मोदी हे 400 पारचा नारा देत आहेत.

विरोधी पक्षातील इतर नेतेही अशीच टीका करताना दिसतात. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री (Pune)अजित पवार यांनी पुण्यात उत्तर दिलं आहे. लोकशाहीत कुणी कुणाचं काम करायचं. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण देश आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. मात्र काही लोकं गैरसमज पसरवत आहेत. जर 2024 मध्ये मोदी सरकार आलं तर ते देशाची राज्यघटना बदलतील असं म्हटलं जातंय. पण तसं काहीही होणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर आहे. ते पुण्यात बोलत होते.

लोकांनी अनेकदा या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रीडा क्षेत्रासाठी मी काम केलं आहे,कुठलीही अडचण येऊ दिली नाही. महाराष्ट्रचा सर्वांगिक विकास कसा होईल हे बघतोय, असं ही अजित पवार म्हणाले.

Alandi : शुक्रवारी सकल मराठा समाज शिरूर मतदार संघ यांच्यावतीने आळंदी मध्ये बैठक

ते पुढे म्हणाले ,काही लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. फोन करती. पण त्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका. महाराष्ट्र केसरीतील वाद मिटवावा असं मला वाटतंय. खेळात वाद नको. मी काय फक्त बारामती… बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे.

जसा कोल्हापूरच्या तालीम संघाचा विकास आराखडा आहे. तसा आराखडा तयार करण्यात येईल. पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात कुलगुलगुरूंची नेमणूक केलेली आहे. मला तुमची सर्व मतदारसंघात मदत पाहिजे. आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.