Alandi : शुक्रवारी सकल मराठा समाज शिरूर मतदार संघ यांच्यावतीने आळंदी मध्ये बैठक

एमपीसी न्यूज – अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक बैठक(Alandi) बोलावून समाजाची भुमिका स्पष्ट केली व प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष एक उमेदवार देण्याचे जाहीर केले.
त्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांनी (Alandi)व मनोज जरांगे पाटील यांचे विचार व ध्येय धोरणे डोळ्यासमोर ठेवून समाज्याची प्रामाणिक पणे काम करण्यास तत्पर असणाऱ्यांची सकल मराठा समाज (शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व तालुके, व सर्व विधानसभा मतदारसंघ)यांच्या वतीने दि.29 रोजी आळंदी येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत सायंकाळी 5 वा.विशेष बैठक आयोजित केली आहे.

Loksabha Election 2024 : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा

 समाजीक कार्य करीत असताना सर्वांचे मत व भावना जाणून घेण्यासाठी या  बैठकीचे आयोजन केले आहे.  व तसेच या  मीटिंगमध्ये उमेदवाराच्या निर्णयावर चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी मराठा समाजाने  सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.