Mundhwa : मुंढवा येथे बंगल्यामध्ये लागली आग; दोन जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंढवा येथे संकल्प बंगल्यातील (Mundhwa) स्वयंपाक घरात अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून यामध्ये एक महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी, की  मुंढवा रोड येथे संकल्प बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वयंपाक घरात अचानक आग लागली. यावेळी एल.पी. जी.सिलेंडर आणि किचनमधील लाकडी फर्निचर पेटले होते. यावेळी हडपसर अग्निशमन दल वेळेत हजर राहिल्याने मोठी हानी टळली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Kondhwa : मेफेड्रोन तस्करी प्रकरणी कोढव्यातून एकाला अटक, साडे दहा लाखांचे मेफेड्रोन जप्त

या घटनेत घरामधील अंजली ईश्वर सकत (वय 58) यांच्या उजव्या बाजूचे हात, पाय आणि जतिन ईश्वर सकत (वय 32) याचे उजव्या बाजूचे हात, पाय भाजले तसेच डोक्याच्या एका बाजूचे केस जळले आहेत. या दोन्ही जखमींना (Mundhwa) दलाच्या जवानांनी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

या कामगिरीमध्ये प्रमोद सोनवणे,तांडेल रणदिवे, फायरमन जगताप, बिचकुले,  कवडे, गौ.कांबळे यांनी तसेच हडपसर अग्निशमन केंद्रकडील तांडेल, शौकत शेख  यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.