Mundhwa : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – मुंढवा परिसरातील पेट्रोल (Mundhwa) पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. तर, तिघेजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

हर्षवर्धन ऊर्फ लकी मोहन रेड्डी (वय19), कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे (वय 19), तेजस ऊर्फ सनी आश्विन पिल्ले (वय 20), शशांक श्रीकांत नागवेकर (वय 20, सर्वजण रा. केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चौघांसह इतर तीन साथीदारांविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पत्रकार निखिल वागळे यांच्या भाषणावरून महायुती – महाविकास आघाडी आमनेसामने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनगर परिसरात बुधवारी रात्री पोलिस गस्तीवर होते. त्यावेळी झेड कॉर्नरजवळ काही संशयित तरुण थांबलेले असून, एका पेट्रोल पंपावर रोकड लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी दिनेश भांदुर्गे यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

तर, त्यांचे अन्य तीन साथीदार अंधारात पसार झाले. आरोपींकडून (Mundhwa) कोयता, तलवार, लोखंडी रॉड, मिरची पूड जप्त करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त ए. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख,वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार, संदीप जोरे, उपनिरीक्षक धनंजय गाडे, सहायक फौजदार संतोष जगताप, पोलिस कर्मचारी दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, दिनेश राणे यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.