Loksabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत 229 अर्ज दाखल झाले आहेत.

पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे.

Alandi : शुक्रवारी सकल मराठा समाज शिरूर मतदार संघ यांच्यावतीने आळंदी मध्ये बैठक

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या (Loksabha Election) शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक 51, नागपूर 62, भंडारा- गोंदिया 49, गडचिरोली- चिमूर 19 आणि चंद्रपूर 48 असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.