Amol Kolhe: अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवनेरी किल्यावर भेट

एमपीसीन्यूज -अमोल कोल्हे आज शिवनेरी किल्यावर आले (Amol Kolhe )होते. तिथे डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट झाली. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या पाया पडत त्यांना नमस्कार केला.

दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते. लढण्यासाठी (Amol Kolhe)ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितलं.अस अमोल कोल्हे म्हणाले.

ते पुढे म्हणाले,वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे. म्हणून की आढळराव पाटील यांना नमस्कार केला, ही संस्कृती जपली पाहिजे.

Lok Sabha Election: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून होणार सुरवात

कांदा आंदोलन बद्दल बोलतांना कोल्हे म्हणाले,आढळराव पाटील यांनी एक जरी वारी दिल्लीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असत. आक्रोश मोर्चाची त्यांची टिंगल त्यांनी केली नसती तर बरं वाटलं असत.

 

कोल्हे पुढे म्हणाले,धोरणात्मक टीका व्हायला हवी, वैयक्तिक टीका, व्यावसायिक कामाविषयी टीका करणार नाही, पण धोरणात्मक टीका होणार.
समोरासमोर बसून चर्चा करु पाच वर्षात मी काय केलं यावर बोलू.

2019 ची निवडणूक मी शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने लढवली आणि आताही तेच करतोय. असं ही अमोल कोल्हे म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.