Panshet : मैत्रीच्या वादातून 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा कोयत्याने खून

एमपीसी न्यूज – मैत्रीत झालेल्या गैरसमजातून 2 जणांनी एका  15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा कोयत्याने खून केला. ही घटना  पुण्यातील पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत घडली.

प्रकाश हरिसिंग रजपूत (वय 15 ) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होता. तो नेहमीप्रमाणे   शाळेत गेला. 10.30  वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला.मणेरवाडी हद्दीतील मह डोंगरावरील आनंद सोसायटीतील फार्ममधील घरात त झोपेत असताना हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयते, धारधार शस्त्रांनी वार केले. जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला. मात्र, शंभर फूट अंतरावर तो कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि हल्लेखोर तरुण (2अल्पवयीन) यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती. प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याचं निष्पन्न ( Panshet ) झाले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.