Pune : पुणे पोलीस आयुक्तालयाचे बदलणार रुपडे, गृह विभागाकडून नवीन इमारतीसाठी 193 कोटींचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज- पुणे पोलीस आयुक्तालयच्या नवीन इमारत व नविन सेवा ( Pune) सुविधासाठी राज्य सरकारच्या गृहविभागाने 193 कोटी 80 लाख 59 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बांधकाम विभागाकडून नवीन इमारतीचे काम केले जाणार आहे.

पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. पोलीस ठाण्यांची संख्या वाढली असून,  पुणे पोलीस आयुक्तालयातील इमारत अपुरी पडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर पुणे पोलीस आयुक्तालयात नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयातील सध्याची इमारत कामकाजाच्या दृष्टीने अपुरी पडत होती.

त्यामुळे नवीन इमारत बांधण्यास परवानगी, तसेच निधी उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 242 कोटी 99 लाख 91 हजार 115 रुपये अपेक्षित असल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले होते. प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाजपत्रक पाठविण्यात आले होते.

Alandi : सिद्धबेटजवळील वारकरी सभागृहाची पालिकेच्यावतीने स्वच्छता

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत 193 कोटी 80 लाख 59 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याबाबतचे आदेश शनिवारी देण्यात आले. पोलीस आयुक्तालयाचा भूखंड गृह विभाग, महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. याबाबत खात्री केल्यानंतर काम सुरू करण्यात यावे. कामाच्या निविदा मागविण्याचा आधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरू करण्यात येऊ नये, अशा अटींचा समावेश ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.