Alandi : सिद्धबेटजवळील वारकरी सभागृहाची पालिकेच्यावतीने स्वच्छता

एमपीसी न्यूज – आळंदी येथील सिद्धबेटाजवळील (Alandi ) वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेले सभागृह वापराविना पडून आहे. त्या सभागृहात पक्षांची विष्ठा,दारूच्या बाटल्या इ . अस्वच्छता  याबाबतचा व्हिडीओ व फोटो इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे यांनी काल दि .18 रोजी सोशल मीडियावर शेअर केले.

तसेच तेथील परिस्थितीचे वृत्त ही एका वृत्त संस्थेने प्रसारित केले होते. वृत्त व सोशल मीडियाच्या त्या व्हिडीओ ची  व फोटोंची दखल घेत आज दि.19 रोजी सकाळी पालिकेच्या वतीने त्या वारकरी सभागृहाची आरोग्य विभाग कर्मचारी व अग्नीशमन दलाच्याच्यावतीने स्वच्छता  करण्यात आली.

Khadki : पूर्ववैमनस्यातून खडकी परिसरात तरुणाचा खून 24 तासात आरोपीला अटक

सभागृहाच्या सुरक्षेसाठी लवकरच गेट बसविले जाईल. याचबरोबर माउलींचे ओव्या आणि जीवन चरित्राचा परिचय करून देणारी चित्रे भिंतीवर साकारली जातील. भाविकांना ध्यानधारणेची (मेडिटेशन) सुविधाही लवकरच निर्माण करून दिली जाईल. स्वच्छता आणि सिद्धबेट स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाला स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची आदेश दिला जाईल.असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी एका वृत्त संस्थेला माहिती देताना सांगितले (Alandi ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.