Khadki : पूर्ववैमनस्यातून खडकी परिसरात तरुणाचा खून 24 तासात आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – खडकी परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह ( Khadki) जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपीला 24 तासांत धानोरी परिसरातून अटक केली आहे. रविवारी (दि.17) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

विजय राजू धोत्रे (वय 33, रा. बॉम्बे सॅपर्सजवळ, येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुधीर साहेबराव जाधव (वय 32, रा. विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

PMPML : 64 व्या वार्षिक ए.एस.आर.टी.यु. च्या परिषदेमध्ये पीएमपीएमएलचा सन्मान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन खडकी पुलाखाली मुळा नदीच्या पात्रात जलपर्णीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून करून मृतदेह जाळल्याचे दिसून आले. याबाबत खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याठिकाणी एक चिठ्ठी आढळून आली. शिवाय, मृत तरुणाच्या कपड्यांच्या तुकड्यांच्या आधारे तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी खडकी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.मृत तरुण येरवडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नातेवाइकांना भेटल्यानंतर मृत तरुणाच्या पायाला झालेल्या जुन्या जखमेवरून त्याची ओळख पटली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सुधीर जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्या इतर साथीदाराचा शोध घेण्यात येत ( Khadki) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.