PMPML : 64 व्या वार्षिक ए.एस.आर.टी.यु. च्या परिषदेमध्ये पीएमपीएमएलचा सन्मान

एमपीसी न्यूज – नवी दिल्ली येथे 15 मार्च रोजी पार पडलेल्या 64 व्या वार्षिक ए.एस.आर.टी.यु. च्या ( PMPML) परिषदेमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ला वाहतूक नियोजन विभागाच्या श्रेणीमध्ये पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ या नवीन संकल्पनेसाठी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

ए.एस.आर.टी.यु. चे अध्यक्ष तथा भारत सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन, ए.एस.आर.टी.यु. चे उपाध्यक्ष राव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी हा पुरस्कार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर व मुख्य वाहतूक व्यवस्थापक (संचलन) सतिश गव्हाणे यांनी स्वीकारला. यावेळी ए.एस.आर.टी.यु.चे संचालक टी.सूर्या किरण यांचे प्रमुख उपस्थिती होती.

Kondhawa : कोंढवा भागात अवजड वाहनांना बंदी

असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (ए.एस.आर.टी.यु.) च्या परिषदेमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ने पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ  ही नाविन्यपूर्ण संकल्पना पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. संजय कोलते यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक नियोजन विभागाने ए.एस.आर.टी.यु. कडे मांडली ( PMPML) होती.

ए.एस.आर.टी.यु. या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने सभासद असलेल्या वाहतूक संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये उत्तम कार्यप्रणाली, नाविन्यपूर्ण संकल्पना या बाबींसाठी नामांकने मागविली होती.पुणे शहरातील आर्किटेक्ट तथा सर्ग स्टुडिओचे संचालक योगेश दांडेकर यांचे कल्पनेतून पीएमपीएमएलच्या वाहतूक नियोजन विभागाकडे पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ ही संकल्पना सादर करण्यात आलेली होती.

या संकल्पने अंतर्गत पीएमपीएमएलचे वाहतूक नियोजन अधिकारी (आय.टी.) विजय रांजणे यांनी ए.एस.आर.टी.यु. यांचेकडे बस मार्गाचे लाईन मॅप, जंक्शन मॅप, बसथांब्यावर वारंवारितेचे वेळापत्रक, बस कनेक्टिव्हिटी मॅप व बसथांब्यांचे पोलचे मॅप प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी मुख्य बसस्थानकांवर लावण्याबाबत संकल्पना मांडली ( PMPML) होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.