Kondhawa : कोंढवा भागात अवजड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज  – कोंढवा भागातील शीतल चौक, अशोका म्यूझ सोसायटी, पारगेनगर आणि कौसरबाग परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून मंगळवार (दि. 19) पासून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

 

कोंढव्यातील ज्योती हॉटेल येथील चौकातून फकरी हिलमार्गे साळुंखे विहारकडे जाणारी अवजड वाहतूक आणि पाण्याच्या टॅंकर्सना उजवीकडे वळण्यास बंदी राहील. पर्यायी मार्ग- लुल्लानगर येथील पुलाखालून अवजड वाहनांना यू-टर्न घेऊन साळुंखे विहारकडे जाता येईल.
ज्योती हॉटेल येथील चौकातून डावीकडे वळून मेफेअर जंक्शनमार्गे पारगेनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना आणि पाण्याच्या टॅंकर्सला मनाई करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग- ज्योती हॉटेल येथील चौकातून सरळ शीतल चौकमार्गे पारगेनगरकडे जाता येईल.पारगेनगर येथून मेफेअर जंक्शनमार्गे ज्योती हॉटेलकडे जाणारी अवजड वाहतूक आणि टॅंकर्सला बंदी राहील. पर्यायी मार्ग- अवजड वाहनांना पारगेनगर येथून शीतल चौकमार्गे ज्योती हॉटेलकडे जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.