Thergaon : आठ वर्षीय मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – बापाने आपल्या आठ वर्षीय मुलीला गळफास ( Thergaon ) लावला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 19) पहाटे पाच वाजताच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आली.

भाऊसाहेब बेदरे आणि नंदिनी बेदरे (वय 8, रा. गुरू नानक नगर, थेरगाव) अशी बाप आणि लेकीची नावे आहेत.

 Pune : पुणे पोलीस आयुक्तालयाचे बदलणार रुपडे, गृह विभागाकडून नवीन इमारतीसाठी 193 कोटींचा निधी मंजूर

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथे राहत्या घरामध्ये लहान मुलगी आणि तिच्या वडिलांचा मृतदेह आढळून आला. वडील भाऊसाहेब यांनी मुलगी नंदिनी हिचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भाऊसाहेब यांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला आहे.

वाकड पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून चिट्ठी मधील मजकुरा बाबत माहिती मिळू शकली नाही. वाकड पोलीस तपास करीत ( Thergaon ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.