Pune : मी पुणे लोकसभेच्या रिंगणात ज्यावेळेस उतरेन त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीला वेगळी रंगत येईल – वसंत मोरे

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले  नेते अशी ( Pune ) ओळख असलेले वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी  मनसे सोडल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी पुणे लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे  स्पष्ट केले. त्यासाठीच आपण मनसेतून बाहेर पडल्याचे त्यांनी म्हटले  .  ज्या दिवशी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, त्या दिवशी पुणे शहरातील चित्र बदलले असणार आहे, असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

Thergaon : आठ वर्षीय मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या

ते म्हणाले माझं  राजकीय भविष्य उज्वल आहे. मी थोडा वेळ घेत आहे.  लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. मी महविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू केली असून मी योग्य दिशेने चाललो आहे. संपूर्ण पुणे शहरात माझ्या  कार्यकर्त्यांची टीम फिरत असून सर्वे सुरू आहे. माझा प्रयत्न सुरू आहे.  महाविकास आघाडीतून मला तिकीट मिळण्याची शक्यता आहे.  वसंत मोरे पुणे लोकसभेच्या रिंगणात ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीला वेगळी रंगत येईल.  मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे . मी वसंत मोरे पुणे लोकसभेत एक नंबर वर असेन.

तसेच ते म्हणाले,  माझ्या उमेदवारीचा जर भाजपला फरक पडणार नसेल तर मला दोन वर्षांपूर्वीपासून भारतीय जनता पार्टीत येण्याचा आमंत्रण चंद्रकांत पाटलांनी दिलंच नसतं.

राज ठाकरे विषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी पुणे लोकसभेवरती लक्ष केंद्रित केले आहे . त्यामुळे मला इथे निवडणूक जिंकण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील ते करत आहे . मात्र मी राज साहेब ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावरती कोणतेही भाष्य करणार ( Pune ) नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.