Pune : समाजातील भावभावनांचे प्रतिबिंब उतरणार चित्रप्रदर्शनातून

एमपीसी न्यूज –  पुणे येथील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे ( Pune ) चित्रकार स्वाती साबळे व प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांच्या ‘कॉन्फ्लुएन्स’ चित्रांचे प्रदर्शन  हे चित्र आज मंगळवारपासून सुरु होणार आहे. समाजातील भावभावनांचे प्रतिबिंम्ब, कोरोनातील जाण्याचा लढा  आणि महिलांचे जगणे, सह्याद्रीचे वैभव चित्रप्रदर्शनातून उलगडणार आहे.

स्वाती साबळे या संवेदनशील चित्रकार आहेत.त्या मूळच्या पुण्याच्या आहेत. अभिनव कला महाविद्यालय आणि मुंबईतील सर जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून आर्ट मास्टर्स पूर्ण केले आहे.  स्रियांबद्दलची अस्था व सामान्य माणसांची जगण्याची व्यथा त्यांच्या चित्रांचे विषय आहेत. स्रियांबद्दलची आस्था व सामान्य माणसांची जगण्याची व्यथा यावर चित्रे रेखाटली आहेत.  प्रदर्शनातील चित्रमालिका म्हणजे स्वतःशी केलेला संवाद आहे.

Pune : मी पुणे लोकसभेच्या रिंगणात ज्यावेळेस उतरेन त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीला वेगळी रंगत येईल – वसंत मोरे

स्वाती साबळे म्हणाल्या, कोरोनाचा काळ प्रचंड परिवर्तनाचा व  सर्वांसाठी खूप आत्मपरीक्षणाचा काळ होता, अनेकांनी एकाच स्थायी बिंदूपासून बहिर्मुख जीवनाचे निरीक्षण केले.  स्वतःच्या घरात बंदिस्त अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचे दुःख वेगळे होते.  कोरोना काळात काही विमुक्त पाहुणे, म्हणजे चिमण्या आणि  कावळे त्यांच्या चित्रांतही डोकावतात व घर करतात. प्रत्येकाचा अस्तित्वासाठी जगण्यासाठी चाललेला संघर्ष, आपल्या अस्तित्वाचा क्षणभंगुर स्वभावधर्म, सर्व काही आणि काहीही नाही; हे एकाच नाण्याच्या बाजू असणे अशा विषयांना स्पर्श केला आहे. चलनाचे काल्पनिक मूल्य आणि मानवी अस्तित्वाचे वैचारिक मूल्य, या दोहोन्ना ह्या अशांत, गुंतागुंतीच्या आणि प्रवाही चित्रांमध्ये मांडले आहे.”

प्रा .डॉ . साबळे हे सर जे. जे स्कुल ऑफ आर्ट या कला संस्थेमध्ये अधिष्ठाता आहेत. त्यांनी सह्याद्रीच्या परिसरातील निसर्गाचे  विविध अनुभव त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. सह्याद्रीचे पठार तेथील उंच सुळके असलेले डोंगर, एकदम तासलेलं कडे  खोल दऱ्या यांच्यासोबत  झाडांचे आकार ,खोड,फांद्या,मुळ व त्यापासून निर्माण होणारे आकृतिबंध  यांच्यापासून प्रेरीत होऊन चित्र निर्मिती केली आहे.”

डॉ साबळे म्हणाले, ”निसर्गाला चित्रीत करण्यासाठी जलरंग हे आदर्श माध्यम आहे. पाणी या तत्वाचा त्याच्या ओघवतेपणाचा ,तरलतेचा व पारदर्शक पणा या स्वभाव गुणधर्माचा वापर केला आहे. कॅनव्हास वर काम करताना सुद्धा एक्रेलीक रंग पारदर्शक व काही प्रमाणात अपारदर्शक पद्धतीने वापरले ( Pune ) आहेत.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.