Pune : पुणेकरांनो पाणी जपून वापरा ; धरणांत केवळ 23 टीएमसी पाणी

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ( Pune)  खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणांमध्ये सुमारे 79 टक्के म्हणजेच 23 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आतापासून पुणेकरांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणात 42टक्के पाणी असून उर्वरीत जिल्ह्यातील 21 धरणांमध्ये सुमारे 69 ते 96 टक्क्यां दरम्यान पाणीसाठा आहे.

Nigdi : इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या शंभर सायकलिस्टचा 1200 किमीचा  पुणे ते सोमनाथ सायकल प्रवास

पुणेकरांना 2 वेळा पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने वर्षाला 18 टीएमसी पाणी लागते. पुणेकर भरपूर पाणी वापरत असल्याचा आरोप केला जातो. सध्या देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली पुण्यात एकप्रकारे पाणीकपात लादण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे.
सध्या केवळ 79 टक्के पाणीसाठा आहे. पुणेकरांना 2 वेळ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. पुण्यातील पेठांमध्येही पाण्याची बोंबाबोंब आहे. उपनगरात असमान पाणीपुरवठा होत आहे. कात्रज, आंबेगाव, हडपसर, बाणेर, बालेवाडी, बावधन, नगररोड, येरवडा, विश्रांतवाडी परिसरात पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या ( Pune) तक्रारी आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.