Pune : दोन लाख पुणेकरांना वाढीव प्रॉपर्टी टॅक्स

एमपीसी न्यूज – मिळकतकरातील 40 टक्क्यांची सवलतीसाठी ( Pune ) दोन लाख मिळकत धारकांनी अर्ज न केल्याने या मिळकतधारकांना वाढीव देयके पाठविण्यात येणार आहेत. त्यातून 50 कोटींचे उत्पन्न मिळेल, असे पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

Pune : पुणेकरांनो पाणी जपून वापरा ; धरणांत केवळ 23 टीएमसी पाणी

दरम्यान, सध्या नांदेड सिटीमधील सदनिका धारकांना मिळकत कर आकारण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. पुणे महापालिका आणि सोसायटीधारक आमने सामने आले आहेत. यापुढे सवलतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या मिळकतधारकांना पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिल 2024 पासून सवलत देण्यात येणार आहे.

शहरातील निवासी मिळकतींना वर्षानुवर्षे मिळणारी 40 टक्क्यांची सवलत 1 एप्रिल 2023 पासून रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याचे तीव्र पडसाद पुणे शहरात उमटल्यानंतर चालू आर्थिक वर्षापासून ही सवलत कायम ठेवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. मंत्रीमंडळ आणि विधानसभेतही त्याला मंजुरी देण्यात आली.

त्यामुळे ज्या मिळकतधारकांना वाढीव देयकांची नोटीस पाठविण्यात आली आहे आणि ज्यांनी थकबाकीसह वाढीव मिळकतकर भरला आहे, अशा सव्वातीन लाखांहून अधिक मिळकतधारकांसाठी योजना राबविण्यात आली होती. या योजनेची मुदत 30नोव्हेंबर रोजी ( Pune ) संपुष्टात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.