Nigdi : इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या शंभर सायकलिस्टचा 1200 किमीचा  पुणे ते सोमनाथ सायकल प्रवास

एमपीसी न्यूज – इंडो ऍथलेटिक्स सोसायटीचे दरवर्षी लांब पल्ल्याच्या सायकल राईड आयोजित करण्याचे ( Nigdi ) सलग तिसरे वर्ष असून यापूर्वी पुणे ते कन्याकुमारी , पुणे ते गोवा,  पुणे ते हम्पी आणि आता पुणे ते सोमनाथ गुजरात आयोजन करण्यात आले. शनिवार (दि.9) सकाळी 5 वाजता निगडी भक्ती शक्ती येथून या राईडला सुरुवात करण्यात आली.

उद्योजक अन्नारे बिरादार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी हेमंतराव हरहरे, मिलिंद डांगे, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, देवराई फाउंडेशन चे धनंजय शेडबाळे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईडला सुरुवात  करण्यात आली.

दरम्यान एनर्जेलसाठी प्रदीप टाके, प्रोटीनसाठी मदन शिंदे , टीशर्टसाठी नितीन पवार, काही ( Nigdi ) ठिकाण चे ब्रेकफास्टसाठी सुनिल चाको, चिंतन देसाई, स्वामीनाथन श्रीनिवासन, गणपत मासाळ यांनी सहकार्य केले. गुजरात येथील विविध स्थानिक ग्रुप सदस्य वर्षा शहा, श्वेता व्यास, नितीश सिंग, राजेश्वर राव, सी आय एस एफ चे अधिकारी विश्वास गवळी, श्रीराम बाबर यांचे विशेष सहकार्य लाभले . वलसाड आणि भरूच येथील स्वामी नारायण मंदिर, वटामन येथे इंद्रगज जैन मंदिर, गोंदल येथील भुवनेश्वरी देवी पीठ, जुनागड येथे गोरक्षनाथ संस्थान तर्फे तर सोमनाथ येथे मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे सर्व साईकलिस्टचे भव्य स्वागत करण्यात आले.

Metro : पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गिकेची निविदा प्रक्रिया सुरु

बाराशे किलोमीटर प्रवासाचा मार्ग आणि उद्देश खालील प्रमाणे होता

पुणे – वसई – वलसाड – भरूच – स्टॅच्यू ऑफ युनिटी – वटामन – गोंधल – जुनागड – सोमनाथ – गीर अभयारण्य – गिरनार असा बारशे किलोमीटरचा प्रवास आठ दिवसांचा होता. उद्देश देशांमध्ये सायकल पर्यटन वाढवणे, युवा पिढी मध्ये क्रीडा आरोग्य , ऑफिसला जाण्यासाठी आणि शाळेमध्ये जाण्यासाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर व्हावा आणि आपल्या देशातील प्रदूषण कमी होण्यासाठी हातभार लागावा याबद्दल याबद्दल प्रबोधन करणे असा विविध हेतूने देशभर इंडो अथलेटिक सोसायटी दरवर्षी देशातील विविध राज्यांमध्ये लांब पल्ल्याची राईड आयोजित करत असते.

या प्रवासामध्ये तब्बल 100 जणांचा सहभाग होता. यामध्ये गिरीराज उमरीकर, अमित पवार, योगेश तावरे, नितीन पवार, महेश मगदूम, युवराज पाटील, आनंद गुंजाळ, संकेत कुमार चव्हाण, महादेव पाटील, चिंतन देसाई, स्वामीनाथन श्रीनिवासन, सुनील चाको, नंदकुमार नखाते, दादासाहेब नखाते, प्रशांत सगरे, संतोष साळुंखे, संदीप गायकवाड, सोपान औटी, नारायण औटी, प्रणय कडू देविदास थिटे, संतोष टोणपे, प्रभाकर पवार, वैभव तांबे, अमित नखाते, नंदकुमार उत्तेकर, विवेक कडू, श्रीकांत चौधरी, प्रशांत जाधव, अविनाश अनुशे, चिन्मय पाटील, दत्तात्रय आनंदकर, रोहित दिघे, पंकज मुनोली, देवेंद्र नेमाडे माणिकराव पाटील संतोष पाथरूडकर, सुरेंद्र कुलकर्णी, प्रो. ज्ञानेश्वर कानडे,

ॲड. पंजाबराव इंगळे, श्रीकांत परीकीपडला, अशोक पालेकर, संजय गजभये, तानाजी व्हनमने, मुकुंद दांगट पाटील, सचिन निफाडकर, संकेत उपळेकर, देविदास खुर्द, रमेश माने, भूपेंद्र डेरवणकर, अविनाश चौगुले, मंगेश चौधरी, मनोज चोपडे, राहुल जाधव, नितीन शिरसाट, सुजित नाईक, प्रदीप साळी, संदीप दुधादे, केशवराव ठावकर, मोरेश्वर पिदादी, मदन शिंदे, दीपक उमरानकर, देवेंद्र मोरे, अमित भोजे, महेश कुलकर्णी, सागर शिरभाते, अजित गोरे, श्रीकांत बोरसे, दीपक बुर्कुल, प्रदीप टाके, रमेश सेंचा, अजित माने , प्रशांत तायडे, अक्षय चांदवडकर, मारुती विधाते, अभिजीत सरोदे, ज्ञानेश्वर तांबे, महेश मोरे, अभिजीत रोडे, अभय खटावकर, तसेच नियोजनामध्ये श्री कैलास शेठ तापकीर, कपिल पाटील, संतोष साळुंखे मेजर यांचे सहकार्य मिळाले.

जुनागड येथून रेल्वेने चिंचवड स्टेशनला आल्यानंतर सर्व आयएएस गुजरात टीमचे भव्य स्वागत रांगोळी काढून , औक्षण आणि सर्वांना हार घालून करण्यात आले. यामध्ये अस्मिता पाटील, रुबी चौधरी, मोहीनी गोरे, सविता बोरसे, भाग्यश्री बुरुकुल, हरिप्रिया शशिकुमार, सुशील मोरे, निकिता चौगुले, अमृता पाटील, युवराज पाटील, अश्विनी पाटील आदींचा समावेश ( Nigdi ) होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.