Akurdi : झाडांवर विद्युत रोषणाई करणा-यांविरोधात कारवाई करा, अन्यथा…

एमपीसी न्यूज – आकुर्डी परिसरात झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात (Akurdi) आली. हे नियमांचे उल्लंघन असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. अन्यथा पोलिसांना बोलावून कारवाई करुन घेतली जाईल, असा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिली आहे.

Pimpri : नदी प्रदूषण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा, थेट ‘पीएमओ’कडे तक्रार

पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले,  आकुर्डीतील संभाजी चौकातील रस्ता दुभाजक, फुटपाथवरील झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. झाडांचे संवर्धन, शहर विद्रुपीकरण या निमयांचे उल्लंघन केले आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करु नये अशी आम्ही विनंती केली होती. महापालिका प्रशासनालाही कळविले होते. परंतु, तरीही एका विद्युत ठेकेदाराने झाडांवर रोषणाई केली आहे.

ही झाडे महापालिकेच्या मालकीची आहेत. झाडांवर विद्युत रोषणाई करता येत नाही. वन्यजीव कायद्याचे उल्लंघन आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी झाडे रंगविली होती. आताचे आयुक्त नियमांचे उल्लंघन करत झाडांवर विद्युत रोषणाई करु देत आहेत, हे चुकीचे आहे. ही विद्युत रोषणाई तातडीने काढावी. आयुक्तांनी कारवाई करावी. अन्यथा पोलिस बोलावून कारवाई करुन घेतली जाईल असा इशारा राऊळ यांनी दिला (Akurdi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.